जगातील दोन अब्ज लोकांचे वास्तव्य असलेला दक्षिण आशिया करोनाचे पुढचे केंद्र ठरू शकतो?
करोनाविरुद्धच्या लढाईत दक्षिण आशियाकडे काही जमेच्या बाजू आहेत. जसे की प्रामुख्याने युवा वर्गातील लोकसंख्या आणि मोठे जनरिक औषध उद्योग क्षेत्र. या विषाणूने जर सर्वसामान्य फ्लूप्रमाणे वाटचाल केली, तर मे-जून महिन्यांमध्ये तापमान वाढीमुळे विषाणू बाधितांची संख्या ओसरेल आणि जुलै-ऑगस्टमध्ये पुन्हा उद्भवेल.......